*** वाळुचे घर ***
शेणाचे ना मेणाचे होते
माझे घर वाळुचे होते.........
कावळा हि मज जैसा बुद्धु
पण चिमणीला डोके होते
माझे घर वाळुचे होते.........
रंगित सुंदर शिंपले
अन् छतावरती तारे होते
माझे घर वाळुचे होते.........
सुखाला सीमा नव्हती
ना दुःखाचे वारे होते
माझे घर वाळुचे होते.........
शांत शांत त्या समुद्र किनारी
घरात हसरे गाणे होते
माझे घर वाळुचे होते.........
अजस्त्र लाट ती घेउन गेली
जे जे मज समिप होते
माझे घर वाळुचे होते.........
माझे घर वाळुचे होते.........---------------प्रियांका
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
तू रात्र रात्र जागून कविता लिहितेस ??
nice one......
Post a Comment