Saturday, October 27, 2007
तुझ्या आठवणीचा पाऊस
मला चिंब चिंब करतो
कधी कोरडाच येतो
कधी रिमझीम बरसतो
कधी अश्रुंचा पूर घेवून येतो
आवडत मला या पावसात भिजायला
तुझ्या आठवणीत न्हाऊन निघायला
तुला हि आवडत का रे
या पावसात भिजायला?
आवडेल का तुला?
माझ्या आठवणीत न्हाऊन निघायला
भोगी (पुरुष)
भोगी (पुरुष)
नको ठेवूस सखे स्त्रिये तू
विश्वास कोणा पुरुषावरती
तुझ्या शिलाचे फक्त भोगत
े त्यांना कोणाची लाज न भिती
रुप न बघतील गुण न बघतील
पुरुषाची फक्त तुझ्या शिलावर प्रिती
तू माणशील त्याला देव माणूस
पण धोका देणे हीच त्याची नियती
विश्वास ठेव अगर ठेवू नकोस
पाशवी हिच त्याची वृत्ति

---------- सख्या येरे परतुनी ------------------
लागते ग ओढ सख्याची
कसे आवरू गं मनाला
सखा माझा दूरदेशी
कसे सावरु गं मनाला
सखा येईल परतुनी
वाट त्याची गं पाहते
स्वागतास गं त्याच्या
चंद्र तार्यास बोलाविते
सखा येईल एक दिनी
घेईल मला गं कुशीत
विसरीन सारी दुनिया
त्याच्या गोड बाहुपाशात
सख्या येरे परतुनी
वाट पाह्ते रे तुझी
तुझ्या एका दर्शनाने
धन्य होईल सखी तुझी
पिता, भाऊ, मित्र, पती आणि पुत्र
किती वेगळे हे शब्द
प्रत्येकाचा अर्थ निराळा
प्रत्येकाचा भाव निराळा
पण तुझ्यासाठी
हे सारे शब्द एकच होतात
अन माझ्यासाठी
हे सारे शब्द सार्थकी लागतात.
पित्यासारखी मायेची पाखरण करतोस
भावासारखी खंबीर साथ देतोस
मित्राचा निस्वार्थी सहवास देतोस
पतीचा प्रेमळ स्पर्श देतोस
पुत्रासारखा लाडीक लळा लावतोस
तु अन मी
अनेक नात्यांनी बांधले आहोत
आपले हे सुंदर नाते
आयुष्यभर आपण जपणार आहोत
Thursday, October 18, 2007
अस का होतं..........
खरच हे अस का होतं
आपल्या जवळ येणार छानस फुलपाखरू
अचानक दूसर्या फुलाकडे जातं
खूप दूर् असताना पाहिलेल असत त्याला
वाटतं हे फक्त आणि फक्त आपणाकडेच यावं
छान दोन घिरट्या घेत ते माञ दुसर्याकडे जातं
ते आपल्या जवळ याव म्हणुन खुप सुगंध पसरवतो आपण
सुगंधाबरोबर् रंगाचीही उधळण करतो आपण
पण आपण सोडून दूसरच फूल मनात त्याच्या बसलेल असतं
खरच हे अस का होतं
आपल्या जवळ येणार छानस फुलपाखरू
अचानक दुसर्या फुलाकडे जातं
खूप वाट पहील्यानंतर् आपल मन कंटाळुन् जातं
त्या फुलपाखराचा वीचार न करण्याचा नीश्चय करतं
आणि त्याचवेळी हळुच ते आपल्या खांद्यावरती बसतं
खरच हे अस का होतं
आपल्या जवळ येणार छानस फुलपाखरू
अचानक आपल्याकडेच येत

सांजवेळ
निस्तब्ध ऐशा सांजवेळी तु जवळी असशील का
घेऊनी हातात हात तु जवळी बसशील का
वीरहीणी सरीता बघ चालली भेटण्या सागरास
तडपुनी वीरहात माझ्या तु ही मला भेटशील का
पक्षी ही लगबग चालले
घरट्यात आपुल्या वीसावण्यास
भटकणार्या या पक्षास तु ही वीसावा देशील का
येऊनी माझ्या आठवणीत तु कीती रे हसवतोस
येऊनी माझ्या जवळ तु मला हसवशील का
मागे ठेवुनीया लाल् रंग रवी चालला अस्तास
स्म्ऱुती ठेवुनीया माझ्यासाठी तु ही असा जाशील का
------ Priyanka
