Saturday, October 27, 2007


-------------आभास-------------
शांत शांत
एकांत
हात तुझा
हातात

मन माझे
बेभान

चित्त तुझ
डोळ्यात

तुझा माझा
संवाद
शब्दांविणा

शब्दांत

अचानक...........

आड येई
प्राक्तन

दूर तुज
नेण्यास

किती केला
आकांत
कमी पडे

प्रयास


जळी - स्थळी
आता रे

फक्त तुझा

आभास

No comments: