Saturday, October 27, 2007

---------- नाते तुझे नी माझे ------------

पिता, भाऊ, मित्र, पती आणि पुत्र
किती वेगळे हे शब्द
प्रत्येकाचा अर्थ निराळा
प्रत्येकाचा भाव निराळा

पण तुझ्यासाठी
हे सारे शब्द एकच होतात
अन माझ्यासाठी
हे सारे शब्द सार्थकी लागतात.

पित्यासारखी मायेची पाखरण करतोस
भावासारखी खंबीर साथ देतोस
मित्राचा निस्वार्थी सहवास देतोस
पतीचा प्रेमळ स्पर्श देतोस
पुत्रासारखा लाडीक लळा लावतोस

तु अन मी
अनेक नात्यांनी बांधले आहोत
आपले हे सुंदर नाते
आयुष्यभर आपण जपणार आहोत

No comments: