Thursday, October 18, 2007

अस का होतं..........

खरच हे अस का होतं
आपल्या जवळ येणार छानस फुलपाखरू
अचानक दूसर्या फुलाकडे जातं

खूप दूर् असताना पाहिलेल असत त्याला
वाटतं हे फक्त आणि फक्त आपणाकडेच यावं
छान दोन घिरट्या घेत ते माञ दुसर्याकडे जातं

ते आपल्या जवळ याव म्हणुन खुप सुगंध पसरवतो आपण
सुगंधाबरोबर् रंगाचीही उधळण करतो आपण
पण आपण सोडून दूसरच फूल मनात त्याच्या बसलेल असतं
खरच हे अस का होतं
आपल्या जवळ येणार छानस फुलपाखरू
अचानक दुसर्या फुलाकडे जातं

खूप पहील्यानंतर् आपल मन कंटाळुन् जातं
त्या फुलपाखराचा वीचार करण्याचा नीश्चय करतं
आणि त्याचवेळी हळुच ते आपल्या खांद्यावरती बसतं
खरच हे अस का होतं
आपल्या जवळ येणार छानस फुलपाखरू
अचानक आपल्याकडेच येत

2 comments:

Shashi said...

Excellent!!!
no other words!! really

Soumitra said...

khoopach chan !